प्रतिसाद

[वाचनकाल : १ मिनिट]
response page of website

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद फरक आहे!

कोणत्याही नव्या मार्गी चालू लागणं ही फार नंतरची बाब असते, त्याआधी येतो तो नव्या मार्गी चालण्याचा विचार. हा विचार जेव्हा आपण इतरांना ऐकवतो तेव्हा उमटतात प्रतिक्रिया. या तडकाफडकी उमटलेल्या काही प्रतिक्रियांतून रोष उमटतो तर काहींतून पराकोटीचा उत्साह – हे दोन्ही घातक. पहिल्या प्रकारच्या प्रतिक्रिया नवा विचार सोडायला लावतात तर दुसऱ्या प्रकारच्या गुंगवतात यानं मग निर्णयक्षमता विचलित होते. यापेक्षा गरजेचा असतो तो ‘प्रतिसाद’.

समोरच्याच्या विचारामागचा नेमका विचार हेरून त्याला योग्य तो प्रतिसाद देणं हे फार क्वचित घडतं. म्हणूनच कदाचित तेच आवश्यक ठरतं. विचारांना मिळालेल्या प्रतिक्रियांतून योग्य वाटचाल सुरू ठेवली की मग नवा मार्ग चालण्याला सुरुवात होते. आपसूकच तेव्हा प्रतिक्रियांची संख्या व तीव्रता वाढते आणि प्रतिसाद दुर्मिळ होतात. एक क्षण तर असा येतो जेव्हा सर्व थांबवून पुन्हा स्वकक्षेच्या मर्यादेत परतावसं वाटतं. ‘जेव्हा केव्हा हाती घेतलेले कार्य सोडण्याचा विचार येतो तेव्हा आपण सुरुवात कशासाठी केली होती ते आठवायचं’ अशाने मग पुढं चालण्याचं बळ मिळतं.‌ आणि आपली वैचारिक भूमिका आणखी ठाम होते ती ज्यांना आपली भूमिका समजली होती अशा व्यक्तींच्या मिळालेल्या प्रतिसादांतून.

‘टाकबोरू’ कल्पनेत असताना, निर्मिती प्रक्रियेत घडताना व वास्तवात उतरल्यानंतरच्या वाटचालीत मिळालेल्या अशाच स्फूर्तीदायक, बलदायक प्रतिसादांचा समुच्चय म्हणजे हे प्रस्तुत पृष्ठ.

• नैनो ने सपनो की महफ़िल सजाई है
तुम भी ज़रूर आना . . .


एक ध्यास घ्यायचा. एक स्वप्न रंगवायचं. स्वप्न कुठलं . . . तर आपल्या आवडत्या विषयाचं. साहित्य कसं असावं, कसं नेटकं आणि नेमकं लिहावं याविषयी अगदी स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेऊन आमचा हा मित्र गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळापासून या विषयावर बोलत होता.

तसा हा विद्यार्थी दशेच्या वयातला. ‘लेखक रंगारी’ अशी ओळख घेऊन याचं लेखन समोर आलं. त्याच्या प्रत्येक लेखाचे मुखपृष्ठ पूर्ण काळ्या-पांढऱ्या रंगामध्ये, भाषेचा बाज अतिशय पोक्त. त्याचं लेखन वाचून आणि एकूण सादरीकरण पाहून ह्याला वचकून होतो.

पण पुढे जेव्हा फोनवर बोलणं झाले तेव्हा समजलं की अरे हा तर विद्यार्थी दशेतला लेखक! लिहीण्याविषयीच्या साहित्याविषयीच्या कल्पना घट्ट आणि ठळक. त्याने लिहिलेलं पुढे आणखी वाचत गेलो . . . आणि हे काहीतरी वेगळं पाणी आहे याची खात्री पटली.

तेव्हा त्याने या संकेतस्थळाबद्दल बोलणं सुरू केलं. आणि वर्षभरात पठ्ठ्याने हे संकेतस्थळ सुरू देखील केलं. पूर्णपणे एकहाती, एकटाकी. त्याच्या जिद्दीला मानलं. खूप मर्यादित ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ हाती असताना त्याने घेतलेली ही झेप अवाक करून जाते.

इथे प्रसिद्ध होणारे साहित्य कसं असावं, त्याची भाषा, व्याकरण, इंग्रजीचा वापर टाळणं, विषयांची विविधता याविषयीही त्याने भरपूर काळजी घेतलेली आहे. त्याबद्दल तो आग्रही देखील आहे. लेखक रंगारी आणि त्याच्या या जिद्दीला सलाम! त्याने पाहिलेले हे स्वप्न प्रत्यक्षात येत असताना . . . तिथे जोडलं जाणं हाच मोठा आनंद. ह्या अभिनव साहित्य उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा!

— जय, पुणे (३०-१२-२२)

• आग्यावेताळाशी गाठ!



— सायली, पुणे (०१-०१-२३)

{fullWidth}

نموذج الاتصال