लिहा

[वाचनकाल : १ मिनिट]
typewriter write to us

बऱ्याच वेळा लेखकवर्गात एका समान अनुभवाची पुनरावृत्ती चघळली जाते तो अनुभव – निराशतेचा!

कोणतेही लेख, कथा, कविता किंवा कोणतेही साहित्यप्रकार मनातून कागदावर आणावयाचे झाल्यास मेंदूला अथक परिश्रम घ्यावे लागतात. संदर्भ धुंडाळणे, त्यांचे आकलन करणे, योग्य तो अन्वयार्थ लावणे, ते शब्दांकित करणे, त्यावर संस्कार करणे मग ते डिजिटल स्वरूपात परावर्तित करणे आणि शेवटी त्यावर मुद्रणसंस्कार करणे इतकी मोठी ही प्रक्रिया आहे. हे करत असताना देखील हरेक टप्प्यावर कल्पनेतील साहित्यरचना मूर्त स्वरूपात उतरवण्यासाठी लेखक मंडळी झटत असतात. मात्र इतके करूनही कधीकधी वाचकांतर्फे त्या साहित्याचे हवे तसे स्वागत केले जात नाही. तर येथे लेखकाच्या वाट्याला येते निराशता. लेखकांना उद्भवणाऱ्या या निराशतेच्या मुळावर घाव घालण्यासाठी व त्यांना अधिकाधिक लिहीते करण्यासाठी एकच उपाय आहे – त्यांना उत्तमोत्तम वाचकवर्ग मिळवून देणे. आणि त्यासाठीच टाकबोरू कार्यरत आहे.

आपल्या आत दडलेल्या सुप्त लेखकास, सर्जनशील कवीस व परखड साहित्यिक टीकाकारास ‘टाकबोरू’ खुणावते आहे. ‘टाकबोरू’ आपल्या उत्तमोत्तम साहित्याच्या प्रतीक्षेत आहे. आपल्या या साहित्याने ‘टाकबोरू’ अधिक समृद्ध होईल यात दुमत नाही, त्यासोबतच, आपल्या साहित्यासही भला वाचकवर्ग पुरवण्याचा ‘टाकबोरू’ प्रयत्न करेल. ‘टाकबोरू’शी जोडले जाऊन त्यावर लिहिण्यासाठी हे आमंत्रण.

आपल्या साहित्य संग्रहातील दर्जेदार लेख, भावस्पर्शी कविता-गझल, नाविन्यपूर्ण कथा-समीक्षणे व ‘टाकबोरू’वर अद्याप अस्पर्शीत असणारी इतर नवनवीन साहित्यिक दालने यावर लिहिण्यासाठी आपणास ‘टाकबोरू’ आमंत्रित करीत आहे. तरी आपण आपल्या वेळापत्रकात थोडी जागा ‘टाकबोरू’साठी राखून ठेवत या अभिनव साहित्ययात्रेत सहभागी व्हाल याची ‘टाकबोरू’स खात्री आहे.

आपल्या गाजलेल्या, किंवा त्यामानाने, दुर्लक्षित राहिलेल्या पण उत्तम अशा साहित्यास टाकबोरू जाणकार वाचकवर्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू शकेल. यासाठी आपले लेख, कथा, कविता, समीक्षणे किंवा इतर साहित्य टाकबोरूच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यासाठी आपण पाठवू शकता.

फक्त आणि फक्त स्वरचित साहित्य पाठवावे. गैरप्रकार आढळल्यास संबंधित लेखकास, वापरकर्त्यास संकेतस्थळावर येण्यास अटकाव घातला जाईल.

मुद्रण शुद्ध व टापटीप असावे. आवश्यक त्या संदर्भांचे दुवे (लिंक) सोबतीला जोडावेत. इतर समाजमाध्यमांवरील साहित्य पुनर्प्रकाशित करण्यासाठी टाकबोरूवर कोणतीही बंधने नाहीत. आपण तेही साहित्य आम्हाला पाठवू शकता. फक्त ते साहित्य काहीएक नवा विचार, नवी लेखनशैली वाचकांप्रत पोहचवणारे असावे.

तसेच आपण आपल्या संकेतस्थळाचा किंवा समाजमाध्यमांचा दुवा सुद्धा लेखात जोडू शकता. याच्याने तुमचे साहित्य पसंतीस उतरलेला वाचकवर्ग जोडला जाण्यात आपल्याला सहकार्य होईल. आपले साहित्य ई-मेलवरून वाचकांपर्यंत पोहचवले. वाचकवर्ग वाढवण्यासाठी याची मदत होईल.


{fullWidth}

نموذج الاتصال