समीक्षण

[वाचनकाल : १ मिनिट]
reviews of literature and cinema

समीक्षण. खरंतर समीक्षण वाचण्याआधी समीक्षण म्हणजे काय याची स्पष्टता जास्त आवश्यक आहे. केवळ प्रथमदर्शनी एखादी गोष्ट जशी भावते, जशी दिसते त्याचा झटपट आलेख म्हणजे समीक्षण नाही. या उलट ज्या बाबी पहिल्यांदा नजरेस पडलेल्या नव्हत्या त्या पुन्हा – एकवारच्या धावत्या वाचनातून, चिंतनातून, अनुभवींशी चर्चा करून, संदर्भ पुस्तके, लेख, मासिके धुंडाळून किंवा मग सरळसोट आंतरजालावर मिळालेल्या माहितीच्या अगडबंब जंजाळातून – नेमक्या हेरून काढणे व त्या शब्दांकित करून वाचकांपर्यंत पोहोचवणे . . . समीक्षण हे असेच अपेक्षित आहे.

समीक्षण ज्यावर आधारित आहे ती मूळ कलाकृती – मग ते पुस्तक असो, एखादी ठळक घडामोड असो, संगीत किंवा इतर कला असो किंवा मग माहितीपट असो, नवीन काही असो – आधी ओळखीची असेल तर तिचे पुन्हा स्मरण होऊन ‘अरे हे तर मला त्यावेळी उमगलेच नाही’ अशी ‘युरेका’ भावना वाचकांच्या मेंदूत तरळली पाहिजे किंवा जे त्या कलाकृतीशी भविष्यात ‘रूबरू’ होतील त्यांनी लेखकाच्या नजरेने काही बाबी हेरल्या पाहिजेत तरंच समीक्षण ठोस म्हणावे लागेल. नाहीतर समीक्षणे आणि जाहिरात एकसारखीच!

समीक्षणात माहितीपटांचा समावेश करण्याचे कारण माहितीपट हे मनोरंजनात्मक चित्रपट किंवा लघुपट नसून ठराविक कालातील मानवी जनमानसाचा दस्तावेज असतात. त्यामुळे त्यावर समीक्षात्मक अंगाने लिहिले गेले पाहिजे.

समीक्षण हा कंटाळवाणा वाचन प्रकार नसून वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारा प्रकार आहे, असायला हवा.


{fullWidth}

نموذج الاتصال