मृगजळ


country road digital painting
कडक उन्हात पाहण्यासाठी कोणतीच चीज नाही.

संथ धाप. रहदारीच्या सुनसान रस्त्यावर भर दुपारच्या कडक उन्हात पाहण्यासाठी कोणतीच चीज नाही.


शीळ घालून दमल्यावर कोरड्या घशाने आपण तसाच प्रवास करत राहतो, फुफाट्याच्या लाटांतून . . . चढ लागला तेव्हापासून दामदुप्पट दमछाक . . .


आपल्यासाठी चढ – समोरच्याचा उतार आणि गाड्यांच्या गराड्यात त्या उतारावरून धावणारी एकमेव सायकल . . .


उताराचा आनंद घेणारा तो, रापलेला, चाळीशीपुढचा आणि कॅरेजवर ती, ओळख लपवण्यासाठी लाजून तोंडाला स्कार्फ बांधलेली. सायकल सुसाट वेग पकडते तसे दोघेही खळखळून हसतात . . .


एकीकडे पाय सोडून बसलेल्या तिला घाबरवण्यासाठी तो दोन्ही हातबित सोडण्याचं नाटकबिटक करतो. आणि तीही घाबरून त्याच्या कमरेला विळखा गुंडाळून बसते. पाठोपाठ त्याच्या हसण्याचा आवाज गर्दी चिरून थेट कानात.


शेजारून जाताना तो ओशाळून हसतो आणि कॅरेजवरचे घट्ट मिटलेले लठ्ठ काळे डोळे उघडून तिरप्या नजरेने पाहतात. नजरेत ‘पाहूदेत पाहीलं तर’ असं काहीसं . . .


ऊन मग उरलेल्या रस्त्यात कुठेच भेटत नाही.

{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال