काॅल


lonely girl colourful side angle spray portrait
अशाच एकट्या संध्याकाळी मोबाईल सतत वाजत राहतो.


कोणतीही गोष्ट करायची म्हणलं की माणसाला निमित्ताची गरज भासते. निमित्ताविना माणूस जे करतो त्याला प्रेम म्हणतात! अशाच विनानिमित्त प्रेमातून घडलेल्या फोन काॅलचं अस्वस्थ चित्रण म्हणजे ‘काॅल’ हे स्फुट! ‘वैयक्तिक ते जागतिक’नुसार हे स्फुट वाचून हरेकाला ‘त्या’ एका फोन काॅलची आठवण झाली नाही असं होणं शक्य नाही.


अशाच एकट्या संध्याकाळी मोबाईल सतत वाजत राहतो.


बुडत जाणाऱ्या सुर्यासोबत, त्यालाही अंधार मग आपल्या मिठीत घेरून घेतो.

पुन्हा रिंग वाजते, नाईलाजाने तो फोन उचलतो.

“हॅलो . . . हा बोल?”

त्याचा कोरडा आवाज ती ओळखून जाते.

“सहज केला कॉल . . .” म्हणत तीही सुरूवात सावध करते. थोडा वेळ मग ती इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसते.


पण आज कॉल का केलाय हे दोघांनाही माहित असतं. फक्त त्याला काहीच तिला समजू द्यायचं नसतं. अन् त्याच्या उसन्या हुंकारानं तिला ते सगळं जाणवतं.

दोन मिनिटं मग कुणीच काही बोलत नाही. फक्त दिर्घ श्वासांचा आवाज तेवढाच तिच्या कानी ऐकू येतो. विनाशब्दांची ती शांतता तिच्याशी बोलत असते. ती ते समजते आणि विषय बदलते.


खूप वेळ मग हे असंच चालू असतं. मग न राहून कापऱ्या ओठांवर, तिच्या, तो नेमका प्रश्न येतंच असतो,


अन् तो कॉल कट करतो . . .





{fullwidth}

2 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال