[वाचनकाल : १३
मिनिटे]
कुणीतरी कोणत्यातरी अगम्य भाषेत आपल्याला शिवी हासडली तर ती मनाला डसणार नाही कारण, मुळात ती शिवी आहे हे समजणारच नाही. याचा अर्थ, शिवी हा मातृभाषेचा अविभाज्य घटक. |
या जगात काहीही फुकट मिळत नाही – सल्ला आणि शिवी वगळता! यातही सल्ला भले चुकीचा असू शकेल; पण शिवी? नेहमी योग्य! मुबलक, प्रासंगिक, विविधांगी शिव्या हा कोणत्याही बोलीभाषेतील महत्वाचा घटक. शिव्यांना सांस्कृतिक काही नसले तरी भाषिक दृष्टया महत्त्व असेल? तेही राजभाषा दिनी शिव्यांचा उहापोह करण्याइतपत? . . .
“ओके गायतोंडे?”
“हा बोल ना मा***द!”
“हाऊ फार इज् मुलुंड?”
“कारसे जाएगा तो पच्चीस मिनिट लगेगा, पैदल जायेगा तो एकसौ अठासी
साल लगेगा! मैं तो कहता हूं गोपालमठ निकल जा गां*!”
उठल्या उठल्या सूर्याला उगवल्याबद्दल शिव्यांनी आंघोळ घालणारा सेक्रेड गेम्सचा
‘गायतोंडे’ यदाकदाचित गुगल
असिस्टंट म्हणून काम करू लागला तर चित्र हे असं ‘सुरस व चमत्कारिक’ असणार यात शंकाच
नाही!
हाच गायतोंडे न्यूजरीडर झाला तर ‘साली यह बारिशने छत्रियां तो
सभी मुंबईवालोंकी गां*में खोल रखी हैं!’ पासून ते ‘देखना क्लायमेट चेंज सबको ले
डुबेगा, पर तुमको लं* फर्क नहीं
पडता!’ पर्यंत धडाधड
वाहिलेल्या शिव्यांच्या लाखोलीत बातम्या वेचून शोधून काढाव्या लागतील.
काही वर्षांपूर्वी याच नवाझुद्दीन सिद्दिकीनं ‘ब्लश मीडिया’सह आणलेला ‘गालियोंभरी सौगात’ हा संपूर्ण ‘नॉन सेक्सिस्ट’ शिव्यांचा अफलातून
व्हिडिओ पाहिलात?
“साहेबान, गुस्सा सामने बैठे इन्सानपे और गाली मां-बहनपे? यह तो बडी नाइन्साफी है! ऐसा
नहीं कि आप मां-बहन के खिलाफ है, बस आपके पास जजबातोंको जाहीर करने के लिए अल्फाजों
के विटामिन की कमी है!”
म्हणत त्यामध्ये नवाझनं ठार मख्ख चेहऱ्याने सोज्ज्वळ आवाजात
एकेक शिवी हासडायला सुरूवात केली –
“ऑटो के हाईट के इन्सान, बारिशमें बने सबसे बडे खड्डे, चूहे के चिपड, सस्तीवाली दारू के
ब्रँड के ३० एम एल, ग्यारा डिजिट के ओटीपी, कुत्ते के दुमकी जुए, जुलाबमें पडे टमाटर के छिलके, नालीमें पडे हुए
घुंगराले बाल, पुराने लव्हर के नामका टॅटू, ब्लॅन्क शीट के झेरॉक्स, थूंकमें तले भजिए, जहर की एक्सपायरी
डेट!”
सुमधुर बासरीच्या पार्श्वभूमीवर अशा एकसे एक कल्पक शिव्या
ऐकण्याचं अहोभाग्य प्राप्त झालं म्हणून टपाटप गळणारे आनंदाश्रू पुसत असताना
अस्मादिकांच्या टवाळ डोक्यात विचार डोकावला, यार आजकल ऐसी ‘नायाब तौहीन’ करने के लिए वक्त है
किसके पास?
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना
शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींचा प्रचंड तिटकारा वाटे. त्यांनी १७७६ मध्येच जळजळीत
विधान केलं होतं,
द
फूलिश अँड विकेड प्रॅक्टिस् ऑफ प्रोफेन कर्सिंग अँड स्विअरिंग इज् सो मीन अँड सो
लो दॅट एव्हरी पर्सन ऑफ सेन्सेस इन कॅरेक्टर डिटेस्ट्स इट्!
पुतिनसारख्या हुकूमशहानंही २००४ मध्ये कला आणि प्रसारमाध्यमांमध्ये
अपशब्दांच्या वापरावर वैधानिक बंदी घातली होती. भारतातही ‘असंसदीय’ शब्दांच्या यादीत
मारूतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाणाऱ्या अपशब्दांबाबत सातत्यानं उलटसुलट चर्चा
सुरूच असते. हे पाहून मनात प्रश्न उठतो की, मुळात माणूस हा प्राणी
शिव्या का बरं देत असावा?
अंगठा ठेचकाळल्यावर तुम्ही कचकावून ‘तिच्यायला मेलो!’ वगैरे बडबडता का? तसं असेल तर तुम्ही
निरामय जीवन जगण्याची दाट शक्यता आहे. कारण शिव्या देऊन हृदयाच्या ठोक्यांची गती
वाढते आणि शारीरिक वेदनांची जाणीव बोथट होते. शिव्या देत कठोर वातावरणबदल सहन करणं
५०% प्रमाणात सुसह्य होतं. कठीण वर्कआऊट पार पाडायची मानसिक ऊर्जा मिळते.
स्वित्झर्लंडमध्ये एका साबण कारखान्यात तर कामगारांना एकत्र बसवून काही तास घाणेरड्या
शिव्या सलग उच्चारायला लावून त्याचे परिणाम तपासता त्यांची आज्ञाधारकता, विनयशीलता आणि
टीमवर्क म्हणून एकजूट अधिकच वाढली असे निष्कर्ष निघालेत! घ्या!
‘लॅलोचेझिया’ म्हणजे ‘इमोशनल रिलीफ गेन्ड बाय युजिंग इन्डिसेंट अँड वल्गर लँग्वेज’ हा तर शिव्याशापांचा
सर्वमान्य फायदा. मुद्द्यांची भाषा आणि गुद्द्यांची भाषा यातला पूल म्हणजे शिवी. ‘चूझिंग वर्ड्स ओव्हर
व्हायलन्स’
या महिमेमुळे एका शब्दात किंवा वाक्यात समोरच्याला गार(द) करण्याची ताकद
कोणतीही शिवी नक्कीच बाळगून आहे. पण मुळात शिवी हा वादग्रस्त ‘साहित्यप्रकार’ इतक्या सरसकट वापरला
जाण्याचं मुख्य कारण काय? त्या सतत वारंवार कानावर पडत राहणं हेच.
कोणत्याही शिवीचा उगम देशोदेशी निपजणारी मानसिक घडण, सामाजिक मान्यता, सांस्कृतिक निर्बंध
(किंवा टॅबू) यांवर अवलंबून असतो. शिवी ‘जिव्हारी लागते’, कारण ती शिवी म्हणून ‘मानली जाते’. मानवी मेंदूच्या ‘ब्रोकाज् एरिया’ किंवा ‘व्हर्निकेज् एरिया’ या तार्किक भागांत
भाषेचं केंद्र असतं; तर शिवी ही थेट भावनांचे सिग्नल्स हाताळणाऱ्या ‘लिम्बिक सिस्टिम’ या आदिम, उत्क्रांतीकाळाच्याही
आधीपासून अस्तित्वात असलेल्या भागांत जाऊन प्रोसेस होते. म्हणजे, अपघातात मेंदूला
फटका बसून भाषा संपूर्णतः विसरलेल्या माणसालाही ‘शिवी’ची जाणीव चटकन् होते!
१९१३ साली ‘पिग्मॅलियन’ या सुप्रसिद्ध नाटकाच्या प्रीमियरला नाटककार
बर्नार्ड शॉ यांना एलायझा डूलिटिल् या अभिनेत्रीच्या तोंडी ‘नॉट ब्लडी लाईकली!’ हा संवाद घातल्याबद्दल
चक्क प्रयोग बंद पडायची धास्ती वाटली होती, इतकं वातावरण तापलं होतं!
कारण १०० वर्षांपूर्वी लंडनला ‘ब्लडी’ हा शब्द पूर्णतः निषिद्ध मानला जायचा. आज तो वापरून
गुळगुळीत झालाय की त्याचा ‘अर्वाच्य’ शिवी म्हणून आपण विचारही मनात आणू शकत नाही.
कुणीतरी कोणत्यातरी अगम्य भाषेत आपल्याला शिवी हासडली तर ती मनाला डसणार नाही, रक्त उसळवणार नाही, मेंदू हादरवून
सोडणार नाही कारण मुळात ती शिवी आहे हे समजणारच नाही. याचा अर्थ, शिवी हा मातृभाषेचा
अविभाज्य घटक. शिवीगाळीचे संस्कार बोलल्या ऐकल्या जाणाऱ्या मातृभाषेद्वारे कुटुंब, मित्रपरिवार, प्रसारमाध्यमं आणि
आजूबाजूच्या परिसरातून झिरपत आपल्या भावविश्वाचा हिस्सा बनत जातात.
एक सामान्य अमेरिकन नागरिक समोरच्यावर दिवसाकाठी ८०-९०
शिवराळ शब्दांचा वर्षाव करतो. म्हणजे ताशी किमान ५ शिव्या खरवडून निघाल्याविना
त्याचा घसा मोकळा होत नाही! इंग्लिश, स्पॅनिश, रशियन, इटालियन भाषांमध्ये व्यभिचारी लैंगिक व्यवहाराशी
संबंधित शब्द शिव्या मानलं जातं. अरेबिक आणि व्हिएतनामी भाषा स्त्रीचारित्र्य आणि
समलैंगिकता या बाबींवर घसरतात. याउलट जर्मन भाषेत सेक्सपेक्षा विष्ठेशी निगडित
शब्दांचा वापर शिवी म्हणून होतो. पूर्व महाराष्ट्रात ‘अबे काय *त्या समजता का बे
तुम्ही मला?’
असा शब्दप्रयोग विदर्भात वापरला जातो, तेव्हा त्यामागे मूर्ख, ढ , बुध्दू असा अर्थ
अभिप्रेत असतो. याउलट ‘चू*’ किंवा ‘चू*या’ ह्या शब्दाला पश्चिम महाराष्ट्रात खूप घाणेरडी
लैंगिक शिवी समजतात.
केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने ८ वर्षांपूर्वी ४८ हिंदी-इंग्रजी
शिवराळ शब्दांची एक यादीच जाहीर करून त्यांच्या सिनेमातील वापरावर बंदीचं आवाहन
केलं, तेव्हाही
बिहार-पश्चिम उत्तर प्रदेशातल्या दिग्गज कलाकारांनी हे शब्द आमच्याकडच्या छोट्या
शहरांत शिव्या म्हणून ओळखले जातच नाहीत असा पवित्रा घेतला.
‘साले का दिमाग घुटनेमें है और खोपडीमे लागत है गां* भर पडा है!’ किंवा ‘साफ चु*या कट गया तुम्हारा!’ अशी वाक्यं दैनंदिन
जीवनात वापरायची पण पडद्यावर दाखवायची नाहीत ही दांभिकता नाही काय, असाही प्रश्न उठला.
कारण केवळ बिमारू राज्यांतच नाही तर संपूर्ण पश्चिमोत्तर भारतात रोजमर्राच्या आयुष्यात
सर्रास वापरले जाणारे हे शब्द आता भाषेत नामं, विशेषणं, क्रियाविशेषणं, अव्ययं, म्हणी-वाक्प्रचार
असल्या सगळ्या जबाबदाऱ्या बिनधास्त पार पाडत आहेत. आजकाल पडद्यावर थिरकून आळवलं
जाणारं इश्कसुध्दा ‘कम्बख्त’ आहे,
‘कमिनं’ आहे. बरं ते बदाबद ओतत जाणारी मुन्नीही ‘बदनाम’, तर बबली ‘बदमाश’ आहे. ‘चल हट बहनकी लौ*’ सारखी गाणी आवडीनं
ऐकली जाऊ लागली आहेत. हे ‘आक्रमण’ आहे की ‘संक्रमण’ हेच समजेनासं झालंय!
मग “आ रहा हूं भें*द! गां*में घुस जाओ इन्सानके!” असं केकाटता फोन उचलून करवादणारा, “अबे चल ना *तिये!”
म्हणत रहदारीवर भडकणारा, धावता धावता दुचाकी चालवणाऱ्या बाईकडून पोलीस
म्हणून मदत घेत तिला काय वाटेल याची मुळीच पर्वा न करता “भाग भो*डीके, *य*वाड्या! देखता हूं
कितना दूर भागता है!” ओरडत गुन्हेगाराचा पाठलाग करणारा ‘द फॅमिली मॅन’(?) मधला श्रीकांत
आपल्याला सामान्य वाटू लागतो. इसकी माका भो*डा, गां*में ले लो, सबकी मां *द लेंगे, तेरा बाप गां*, इसमेंभी रं*रोना
होगा, चल निकल यहीं पटकके
*द देंगे तुम्हे अशी कोमल, सुकुमार शब्दसुमनं मिर्झापूर वेबसीरीजच्या संवादांमध्ये बेमालूम पेरली
जातात. किंबहुना ‘आशयघन’ शिव्यांचा अव्याहत भडीमार सुरू असताना अधूनमधून एखादा किडुकमिडुक संवादही
डोकावतो असं म्हणणं जास्त अचूक राहील.
“हम तुम्हारी बॉडीमे इतने छेद करेंगे कि कन्फूज् हो जाओगे की बोले कहासे और
पादे कहासे!” या चुलबुल पांडेच्या डायलॉगवर थिएटरात निर्बुद्ध टाळ्याशिट्यांचा धो
धो पाऊस पडायचा, ते दिवस केव्हाच मागे सरलेत.
“शरद शुक्ला है हमारा नाम, मा**चोद!” म्हणून ट्रिगर दाबणारी पात्रं भयंकर
कूलबिल वाटण्याचा हा जमाना आहे. “पगला गए हो क्या मा**चोद?!”, “प्रचंड *तिया है आप!”, “आप सिवानमें है, यहां बक*दी नहीं
करते!”, “भो*डीवाले चच्चा, आप हमकोही पेलनेके
चक्करमें है?”,
“मां *द दिये भय्याजी आप तो!” असले संवाद हा आजकाल कौतुकाचा विषय होतो.
ग्यानबाची मेख इथंच आहे. “उसके मूहमें तार डालके गां*से
निकालके पतंग न उडाए तो हमाराभी नाम रामाधीर सिंग नहीं!”, “रामाधीर सिंगके पुरे खानदानको
रं* का नाच नचाएंगे!”, “रामाधीर सिंग हमारा झा* नहीं उखाड पाए लेकिन इसकी अम्मी चाहे ना तो . . .”, “गां*के अंधे! बिजली
चली गई तो क्या ऑपरेशन कर!” अशा शिवराळ शब्दांनी संवादांची दाहकता - अस्सलता
अंगावर शहारे आणते किंवा मनाला मस्त गुदगुल्या करते हे खरंच; पण कशाची किंमत
मोजल्यानंतर?
एकुणातच सिनेमा या माध्यमाचं ‘लार्जर दॅन लाईफ’ रूपडं झपाट्याने बदलत
चाललंय. ‘रील लाईफ’ ते ‘रिअल लाईफ’ हे स्थित्यंतर आता
मोठ्या पडद्यावर दिसू लागलंय. उंचच उंच खांबांची, कोरीव कलाबतूच्या दारांची, आडव्यातिडव्या
अवाढव्य दिवाणखान्यांची मोठमोठाली घरं आपली नसतात. आपण मोजून पाच मिनिटांत प्रेम
जमून हिरव्यागार डोंगरावर गात सुटत नाही. कुणीही लफंग्यांना बदडण्याआधी स्लो
मोशनवाल्या हालचाली करत नसतं. त्यामुळे नव्या भारतीय सिनेप्रेक्षकांसमोर
चित्रपटांच्या पटकथा-संवादांनी आपली बेगडी, शोभिवंत नि चकचकीत कात टाकून
दिली हे उत्तमच. तळागाळातल्या उपेक्षित अंधारयुगांचं वास्तववादी चित्रण आरंभलं गेलं
हेही अतिशय स्तुत्य. पण “तेरे शरीरमें उतना खून नहीं होगा जितना रवीकुमार एक
बारमें *त देता है!” असला पानचट संवाद डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या पब्लिकची अभिरूची
काय म्हणावी?
लॉजिक नावाच्या चिमणीला ‘पहली फुरसतमें निकल!’ म्हणत हुसकावून
लावणाऱ्या बॉलिवूडला ‘रविवारसे पहले सोमवार नहीं आता!’ हे समजावण्यात अजिबात अर्थ नाही. “मेरे मनको भाया
मैं कुत्ता काटके खाया!”, “मैं तुझे ऐसा साफ करूंगा कि जैसे हजाम दो बार साबुन
लगाके दाढी साफ करता है!”, “मुझपे आती है तो मैं छोड देता हूं, मेरे भाईपे आती है
तो फोड देता हूं!” असे दर्जेदार संवाद आपण वर्षानुवर्षे ऐकून सुस्कारे सोडत आलोत.
म्हणूनच सिनेजगतातली संतप्त तरूण पात्रं ‘कन्फ्युज्’ ऐवजी
किंकर्तव्यविमूढ वगैरे-वगैरे संस्कृतप्रचुर शब्द वापरतील किंवा आयटम साँग ऐवजी
गझला गातील असं अचाट काहीतरी आम्ही अपेक्षणार नाही.
इथं मुद्दा केवळ श्लील-अश्लीलतेचा नाही; कथानकाच्या ओघात
पात्राच्या ठायी निर्माण होणारी गरज म्हणून शिवीगाळ एक वेळ मान्य. मात्र त्या
ठिकाणी शिवी ही गरज म्हणून घातली जाते की गर्दी खेचून गल्ला भरण्याची मखलाशी
म्हणून हा विचार करणार कोण? “मेरे बारेमें इतना मत सोचना . . . दिलमें आता हूं, समझमें नहीं!” या
सलमान खानच्या तोंडच्या डायलॉगप्रमाणेच ‘शिव्या – एक देणे’ हे दिवसेंदिवस गजकर्णाच्या वेगानं वाढतं प्रकरण
आम्ही सोडूनच द्यायचं का?
मुळात ‘शिव्या देणे’ म्हणजे ‘असंस्कृत वागणे’ का? ‘पुष्कळदा लोक भावनेचा निचरा व्हावा किंवा कमी
शब्दात समोरच्याला आपल्या भावना कळवाव्यात म्हणून, प्रेमानंसुध्दा लोक देत
असतात आणि नेहमीच त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नये’ असा युक्तिवाद बऱ्याचदा
मांडला जातो. मग कसा अर्थ घेणार? तुम्ही काय भावार्थ असलेल्या शिव्या देता का? ‘नटसम्राट’ या चित्रपटात जेव्हा
नाना पाटेकर त्यांच्या नातीला काही सौम्य शिव्या शिकवतात तेव्हा त्यांचा
मुला-सुनांना ते आवडत नाही. तेव्हा ते म्हणतात,
“अरे शिव्या दिल्याने मन हलकं होतं. आमच्या शाळेचे मास्तरपण आम्हाला शिव्या
द्यायचेत. म्हणत, गणप्या भाडखाऊ गृहपाठ तुझा बाप करेल का रे? जे बोलायचं ते समजवायला जर ४
वाक्यं लागत असतील, तर एक शिवी देऊन त्या भावना लगेच समोरच्यापर्यंत पोचतात!”
‘प्रेमापोटीही शिव्या दिल्या जातात!’ हा प्रवाद कुचकामी आहे. हे असं ‘प्रेम’ तुम्ही तुमच्या
ऑफिसच्या बॉसवर करू नका, नाहीतर तो सुद्धा प्रेमाने तुम्हाला घरी पाठवेल! ‘भावनेचा निचरा होतो’ हेही असंच मजेमजेदार
विधान. म्हणजे लोकांनी रोज सकाळी उठून योगासनं, मेडिटेशन्स केलीच नसती, शिव्या हासडूनच
दिवसाची सुरुवात केली असती की!
शिवीचं प्रमेय जरा प्रसंगानुरूप स्पष्टीकरण घेत बघू. घरी
टीव्हीवर काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सेनेच्या चकमकीत आपले काही जवान शहीद झाले अशी
बातमी येते,
तेव्हा घरातल्या जुन्याजाणत्या पुरूषांच्या डोक्यातून रागाची एक तीव्र सणक
निघून तोंडातून शिवी निघते, ‘ह्या फो**च्यांना घरात घुसून मारायला पाहिजे!’ लगेच लक्षात येतं की
ते घरी बसलेयत. इकडेतिकडे बघून जरासे ओशाळतात आणि कुणाच्या ध्यानात आलं नाहीसं
पाहून त्यांना थोडं हायसं वाटतं. मनातल्या खदखदत्या भावनांचं असं विरेचन होत असेल
तर बऱ्याच माणसांना वाटतही नाही की ह्यात काही गैर आहे. ‘तुम्हाला शिव्या देणं आवडत
नसेल किंवा लोक शिव्या देऊन मोकळे होतात ही गोष्ट तुमच्या पचनी पडत नसेल तर ह्याचा
अर्थ असा नाही होत की समोरची व्यक्ती असंस्कृत आहे!’ असाही शेरा मारणारे लोक
थोडके नाहीत. पण तुम्हाला शिव्या देत सुसंस्कृत का व्हायचंय? कोहलीला राग आल्यावर
तो शिव्या देतो, याचा अर्थ राहुल द्रविडला कधी रागच आला नाही, असा निष्कर्ष काढू नये. राग
येणं हे स्वाभाविक, नैसर्गिक. रागावर संयमानं दमन-नियंत्रण ठेवून व्यक्त होणं हा झाला
संस्कृतीचा भाग.
मानसशास्त्राच्या काही शोधनिबंधांमध्ये हेपण वाचलं होतं, की लोक शिव्यांचा उपयोग
पौरूषत्व (Masculinity)
दाखवायला करतात, ज्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीच्या मनावर होतो व
त्याच्यावर एक दडपण निर्माण होतं. कदाचित म्हणूनच बसमध्ये/रस्त्यावरच्या/नळावरच्या
भांडणांत एका शिवीत समोरच्याला सरळ करणाऱ्या एकट्या सिंगल हड्डी स्त्रीपुरूषांच्या
नादी भले-भले लडदूही लागत नसावेत. ’साहेब, बीवी अँड गँगस्टर रिटर्न्स’ या सिनेमात ‘साहेब’ च्या भूमिकेत जिमी
शेरगिल सहज म्हणून जातो : “आपको पता है मर्द ज्यादा गालिया क्यों देते है? क्योंकी वो रोते कम
है!”
‘भारतीय सेनेच्या शीख रेजिमेंटमध्ये जर तुम्ही ऑफिसर असाल आणि सैनिकांना
ऑर्डर देताना, किंवा बोलताना तुम्ही आयाबहिणीच्या शिव्या जर नाही दिल्या किंवा अशा शिव्या
तुम्हाला कुणी दिल्या नि तुम्ही गप्प बसून ऐकून घेतल्यात तर तुम्हाला एक विम्पी (Wimpy) म्हणजे रडका किंवा
बायल्या समजलं जातं’, हे तर कॅप्टन रघू रामन ह्यांनीही एका युट्युब टॉकमध्ये म्हटलंय.
पुरूषांनी आपल्या राग, संताप या भावना आक्रमकपणे
व्यक्त कराव्यात अशी सामाजिक गैरअपेक्षा असते.
किशोरवयीन-नवतरूण मुलगा मार खाऊन आला तर ‘तू बांगड्या भरल्याहेस का?’ यासारखे शब्द ऐकवून
त्याला अपमानित केलं जातं. आक्रमकता न दाखवणारा पुरुष ‘नेभळट’ समजला जातो.
लहानपणापासून ‘मर्दको कभी दर्द नहीं होता!’ छाप रासवटता त्याच्यावर बिंबवली जाते. या
सामाजिकीकरणाचा परिणाम म्हणून असंख्य मुलांच्या तोंडी पौगंडावस्थेपूर्वीच
शिव्यांचा रतीब सुरू होतो.
पण याचा अर्थ, पौरूषत्वाची नेमकी व्याख्याच आपल्याला समजलेली
नाही. राकट,
आक्रमक, आक्रस्ताळी, हिंस्त्र, आंधळेपणानं कमरेखाली वार करण्यात धन्यता मानणारं हे ‘पशुत्व’ असतं, ‘पौरूषत्व’ नव्हे!
देशोदेशींच्या समाजात पुरूष तर शिवी देतोच, पण स्त्रियाही
अर्थाचा घोळ न घालता स्त्रियांना किंवा पुरूषांना शिवीगाळ करत असतात याची चीड
येते. लहान मुलंही मोठ्यांचं अनुकरण करून शिव्या देत असतात हे तर अजूनच गंभीर.
ट्रेनमध्ये विनयभंग करू पाहणाऱ्या रोडरोमिओला शिवीगाळ करणं समजून घेता येतं, पण कॉलेज कट्ट्यावर
निव्वळ ‘कूल’ वाटतं म्हणून मुलगा
किंवा मुलगी यांपैकी कुणीही ‘तुझ्या आईची चि*णी हलली!’ सारख्या शिव्या हसत फेकणं
मला आतल्या आत अस्वस्थ करून जातं.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांनी शिवीगाळ करण्याचं प्रमाण
कमी असलं,
तरी केवळ ‘व्हायब्रेटर्स’ वापरणं, प्रियकर बदलणं आणि पुरूषांसमोर खास पुरूषी शिव्या देणं इतक्याच बाबींत या
विदुषींचा स्त्रीवाद धन्यता मानत असतो यावर माझा तीव्र आक्षेप आहे. शिवीगाळीतला
अपमानास्पद नि शोषणमूलक बंध यांना एक स्त्री म्हणून सलत नाही?
शिवी दिल्याने आपण समोरच्या व्यक्तीच्या आई किंवा
बहिणीविषयी वाईट बोलतो, हे माहीत असूनही माणसं शिव्या का देतात? लोक शिव्या देताना
जनन इंद्रियांचा सढळ वापर का करतात? शिव्या देतांना नेहमी स्त्रियांच्या संदर्भाने का
दिल्या जातात? याचा अर्थ वाईट वृत्ती असण्याचे मूळ स्त्रियांना ठरवले जातं का? एखादा पुरूष दुसऱ्या
पुरूषाला आईबहिणीवरून शिवी देतो, ती ऐकून त्याच्या आई, बहिणीला काय वाटत असेल? यात कुठली कल्पकता, कुठली ‘क्रिएटिव्हिटी’ असते?
गल्लीतल्या भांडणात वेडा, पागल, बावळट, मूर्ख, षंढ इत्यादी शिव्या
लोकांना अगदी ‘मिळमिळीत’ वगैरे वाटतात. कॉलेजात वाफाळत्या शिव्या कचकावून देणाऱ्या मुलामुलींना ‘स्टड’ किंवा ‘बोल्ड’ समजलं जातं. गुर्मीत
किंवा अगदी जातायेता सहजही ‘शिव्या देणं’ हे झपाट्यानं प्रतिष्ठेचं लक्षण का बनत चाललं असावं?
वर्चस्ववादी पुरूषी मानसिकतेमुळे घरातील स्त्री , आई-बहीण-बायको हे
सर्व पुरुषांचं अगदी जिव्हाळ्याचं घराण्याच्या/पूर्वजपरंपरेच्या अभिमानाचं
मर्मस्थान असतं. सगळ्यात नाजूक जागेवर मारलं की जास्त लागतं ना, म्हणून असेल कदाचित.
जास्तीत जास्त दुखावण्याचा उद्देश असेल त्या मागे. पण काय उपयोग! एकाने दिली की
दुसरा तीच लाखोली व्याजासकट परत करतो आणि फिट्टम फाट होतं! मुळात ‘उगारली’ जाते ती ‘भाषा’ असते का? ‘ह भ प च’ चा हा बेछूट गोळीबार कितपत विवेकी आहे?
मध्यंतरी नेटफ्लिक्स इंडियाने काही गाजलेल्या वेबसिरीजचे तुकडे दाखवून
त्यात शिव्यांऐवजी ‘म्याँव!’ आवाज टाकून तुफान धमाल आणली होती. ‘जिमी फॅलन शो’सारख्या विख्यात टॉक शोमध्ये
तर सेलेब्रिटींनी मनमुराद शिव्या घालून धुमाकूळ घालावा याकरता चक्क ‘स्वेअर जार’ हा प्रकार ठेवला
जातोय. “हाय! आय एम निकोलस केज, लेट्स गेट फक्ड्!” अशा दणदणीत घोषणाबाजीनं ‘हिस्ट्री ऑफ स्वेअर वर्ड्स’ या गाजलेल्या
मालिकेत शिव्यांचा इतिहास-भूगोल चवीनं चर्चिला जातोय. ‘वी हॅव्ह स्ट्रिक्ट पॉलिसीज्
दॅट प्रोहिबिट् हॅरॅसमेन्ट इन्क्लुडिंग मालिशिअस इन्सल्ट्स’ हे डिस्क्लेमर केवळ
एक सजावट वाटावी अशा परिस्थितीत आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘क्लीन’ युट्युबर सापडणं हे
पॅसिफिक महासागरात हरवलेली सुई शोधण्याइतकं कर्मकठीण आहे. सगळ्यात वाईट म्हणजे, अगदी डोनाल्ड डक
सारख्या निरागस समजल्या जाणाऱ्या कार्टून्समध्येही ‘एफ्’ वर्ड्स वापरले जातात.
मी त्या लोकांपैकी नक्कीच नव्हे, जे शिव्यांबद्दल किंवा
शिव्या देणाऱ्यांबद्दल अकारण सांस्कृतिक पूर्वानुग्रह बनवून बसतात. माणसाचं मन हे
फार क्लिष्ट आहे. प्रत्येक माणूस सारखा नाही. दैनंदिन जीवनात एखादी व्यक्ती
कुठल्या समस्यांचा सामना करते आणि त्याचा तिच्या मनावर काय परिणाम होत असतो हे
आपल्याला ठाऊक नसतं. अशा परिस्थितीत दबावाखाली कुणीही कशाही प्रकारे रिॲक्ट होऊ
शकतो. हतबल अवस्थेतलं हे शिवराळ वर्तन ‘अंडरस्टँडेबल’ आहे, ‘जस्टिफाएबल’ मात्र नाही.
मला त्याही लोकांचा राग येतो जे शिव्या न देण्याला अगदी ‘संस्कारी’ अस्मितेचा भाग
बनवतात आणि आपण स्वतः किती ‘सज्जन’ आहोत हे दर्शवतात. त्यांच्यासाठी मी एवढेच सांगेन, की आपले
पूर्वजसुद्धा शिव्या द्यायचे. देववाणी मानल्या गेलेल्या संस्कृतमधल्या शिव्याही
उघड-उघड लिंगजातिभेदात्मक होत्या. संतांच्या अभंगांमध्येही प्राकृत बोलीभाषेतले
दाखले स्पष्ट करताना शिव्यांचा स्पष्ट आढळ दिसतो. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपण
सुसंस्कृत समाज झालो आहोत हे मान्य केलं, तरी शिव्यांचं अस्तित्व मानवी अस्तित्वाइतकंच जुनं
आहे आणि ते पूर्णत: पुसता येणं शक्य नाही. शिव्यांचा मथितार्थ गलिच्छच असतो; परंतु ही कहाणी
एवढ्यावरच संपत नाही. ‘यू कॅन लव्ह मी, हेट मी, बट सिम्प्ली कान्ट इग्नोर मी!’ असा लौकिक पावलेल्या
रं*, गां*, बि*, फ*, भ*वा या शिव्या
कुणाला ‘आकर्षक’ वाटतात तर कुणाला ‘विघातक’. खरी गोम आहे ती
इथंच!
‘द आर्ट ऑफ बॅड वर्ड्स’ या व्हिडिओत ‘कॅरीमिनाटी’ हा नावाजलेला
युट्युबर उपहासाचे फटके हाणत म्हणतो, “काम से थका-हारा आदमी ‘आज कलयुग का यह अद्भुत दिन
इतना संघर्षपूर्ण और हताश रहा, कि जलपान करने का अवसरही नहीं मिला!’ ऐसे नहीं बोलता! वह
फटसे कह जाता है- ‘आज गां* फट गई भें**!’ पर तुम्हें फालतू शब्द बोलने की फेटिश है तो कोई
क्या करे?
वह दोस्तही क्या जिसे चू*या कहा न जा सके? जरूरी नहीं कि हर गतिविधि, कर्मता, ॲक्टिव्हिटी के पीछे
एक मिशन हो! इन्सान बिना किसी तात्पर्य, अभिप्राय, मतलब के भी मौज मार सकता है!”
शिव्या देणारा कोणीही पातळलोकीचा सेवक, सैतानप्रेमी, हैवानाचं बीज, इल्युमिनाटी किंवा
निव्वळ ‘अर्धपशू’ आहे असं समजून मोकळं
होण्याची आपण घाई करतो, चार जिगरी मित्रांच्या अड्ड्यावर शिव्या
पाण्यासारख्या वाहतात ही वस्तुस्थिती विसरतो, हे त्याला चुकीचं वाटतं. ‘प्यार बादमें, शादी पहले’ वाल्या युगात पॉर्न
मासिकं छापून वाचणारे शिव्यांबाबत जो दांभिक बुरखा पांघरून फिरतात त्यावर तो “जमाना
बदलता है,
फितरत नहीं!” इतकंच सूचक भाष्य करतो. जाता जाता “क्या इस
व्हिडिओसे मैं यह कहना चाह रहा हूं कि अपने घर मे भें** भें** करके फुदकते रहो? नहीं! ऐसा करोगे तो
तुम्हारा बाप तुम्हे चायनीज माल समझके बॅन कर देगा!” असंही सांगायला तो विसरत
नाही.
कलियुगात ‘स्लॅन्ग’ ही खुद्द एक परवलीची खास भाषा बनली आहे. चालू
मिनिटाला शिव्या ह्या समाजाचा आणि बोलीभाषेचा (Lingo) भाग आहे; पण तो असायलाच हवा
असं मुळीच नाही. ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमाला ‘A’ प्रमाणपत्र का दिलेत ह्याबद्दल दिग्दर्शक प्रवीण तरडे सांगतात.
“सेन्सॉर बोर्डमधील एका म्हाताऱ्या बाईला सिनेमा मधील गुंड्याचा एक संवाद
नाही आवडला. त्यात तो गुंड मा***द ही शिवी देतो. बाई म्हणतात त्याच्या जागी ‘मूर्ख’ वगैरे म्हणायला
लावा. आता तुम्हीच सांगा एक गुंड ज्याच्यावर १० मर्डरचे गुन्हे दाखल आहेत तो काय
कुणाला अरे मूर्ख म्हणून आवाज देईल का?” त्यांनी तो शब्द हटवला नाही आणि ‘U/A’ च्या जागी त्यांना ‘A’ प्रमाणपत्र मिळालं, ज्याचा परिणाम
सिनेमाच्या उत्पन्नावर झाला. पण अशा एखाद्या शिवराळ प्रसंगाचं सिनेमातलं अस्तित्व
खरोखरच इतकं कळीचं होतं का, याचाही विचार व्हायला हवा ना?
“विराट कोहलीने मॅचमें मां चो* दी!” याचा अर्थ ‘विराट खूप छान खेळला’ असा होतही असेल; पण केवळ ‘कूल भासण्यासाठी’ त्या वाक्यप्रयोगाची
खरंच नितांत आवश्यकता आहे का, हे प्रत्येकानं आपापल्या अंतरात्म्याला स्मरून
ठरवायचं. त्यामुळे मी तुम्हाला काही सदासर्वदा सज्जनाप्रमाणे वागा, समोरच्याच्या
दुर्वर्तनाकडं दुर्लक्ष करा, असले फुकटचे सल्ले देणार नाही. एवढंच सांगेन, आपल्या
सद्सद्विवेकानुरूप वागा. दुर्लक्ष करून काम भागत असेल, कुणाच्या शिव्यांनी तुमचं
संयम जात नसेल, कामात व्यत्यय येत नसेल तर सोनेपे सुहागा. शहाण्यानं शिव्यांबाबत कानाला
खडाच लावावा. पण तुमची शांती/विनय भंग होत असतील, कामात मन हादरवून सोडणारा
विचित्र अडथळा येत असेल, तर समोरच्याचा त्याच्याच भाषेत उत्तर वाहून त्याचा
उद्धार करावा आणि त्याची जागा त्याला दाखवून द्यावी. ‘मित्रांमध्ये थोड्याफार
प्रमाणात शिवीगाळ चालतेच!’ हे समजून अशा शिव्यांचाही तर्कशास्त्र जरासं बाजूला
ठेवून मनमुराद आस्वाद घ्यावा; पण ‘चालतेच!’ म्हणजे काय ते आपण आपल्याशीच ठरवून त्याला आपापल्या
अंतर्मनाची कसोटी लावून एक घट्ट खूणगाठही बांधली पाहिजे.
‘शिवी’प्रेमाचा हा उमाळा जेवणात
मिठासारखा हवा हे नव्याने सांगणे न लगे. बाकी, ‘बा चा बा ची’ हा आपला सांस्कृतिक
उपक्रम आहे आणि संस्कृती वाचवण्याखातर तो निःसंशय राबवलाच पाहिजे ह्या विचारावर ‘आशयघन’ चर्चासत्रास प्रचंड
वाव आहे हे खरंच. पण भारताचे लाडके माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं एक वक्तव्य
रॉकेटच्या वेगानं विसरत मागं सोडून चाललोत आपण, ते या निमित्तानं आठवून
पाहायला हरकत नसावी.
‘डोन्ट मिक्स बॅड वर्ड्स विथ युअर् बॅड मूड. यू विल
हॅव्ह मेनी ऑपोर्च्युनिटीज टू चेंज युअर मूड, बट यू विल नेव्हर गेट द ऑपोर्च्युनिटी टू रिप्लेस
द वर्ड्स!’
• संदर्भ :
१) छायाचित्र – टाकबोरू
• वाचत रहा :
Using bad words is totally a personal choice. Using bad words doesn't define a person's character .. but your neutrality regarding the use of bad words in language must be appreciated...your style of writing is seriously amazing you gave the subject an amazing flow with justification in every phase. Your suggestion of remaining neutral is the best solution for this..
उत्तर द्याहटवाYour precious and thoughtful compliment simply made my day. Being neutral in the flow of writing was the most challenging task for me. Otherwise it would utterly sound like plain, monotonous preaching. The journey of discovering cuss words all over the world was amazing and so was finding the roots of their origin.
हटवा☺️Thank you so much from the bottom of my heart ma'am.