शेवटचे पान

[वाचनकाल : १ मिनिट] 
वहीचे शेवटचे पान, last page of notebook

माणूस शाळेतून बाहेर पडतो; पण शाळा माणसाच्या बाहेर पडत नाही! वाढलेल्या व्यापांच्या रामरगाड्यात शाळा आठवणींच्या कप्प्यात दडून बसते‌. मग असेच कधीतरी अनावधानाने एकतर शाळा आठवते, मित्र भेटतात किंवा मग अडगळीत सापडते आपली शाळेतली वही, आणि अर्थातच, तिचे शेवटचे पान आपल्या निरनिराळ्या कलाकृतींनी सजलेले!

नेहमीच सापडतो मी मला,
वहीच्या शेवटच्या पानावर . . .

तिथेच मित्रांसोबत खेळली कोडी,
जाणत आयुष्या‌च्या घडामोडी,
तिथेच केल्या गणिताच्या तडजोडी,
बंधन कसलंही नसायचं मनावर,
वहीच्या शेवटच्या पानावर . . .

सापडलेली शाळेची जुनी वही,
माझे अस्तित्व समोर आणते,
सांगते मला असा नाहीस तू,
जसे आता जग तुला जाणते,
मित्रांसोबतच्या निर्मळ गप्पा,
खेळ, अभ्यास आणि परीक्षा,
खाल्लेला डबाही आता नाही,
भेटलेल्या प्रत्येक मित्रांसोबत,
मन स्वतःची तुलना करून पाही,
आठवणीने केल्या जरा भावना अनावर,
वहीच्या शेवटच्या पानावर . . .

प्रत्येक दिवस असायचो सोबत,
त्यांना भेटायला वेळ नाही,
गुंतलोय सगळे संसारात,
तरी हिशोबाचा मेळ नाही,
सुटली वही सुटली शाळा,
आयुष्याने आणले भानावर,
पण बालपणीच्या सोनेरी आठवणी कोरल्या गेल्यात,
वहीच्या शेवटच्या पानावर . . .


– अक्षय संगवे 
[akshay.sangave@gmail.com]


• संदर्भ :

• वाचत रहा :


 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال