बालचमूंचा विभाग

[वाचनकाल : १ मिनिट]
boy and girl reading a book

बालचमू – आपल्या उज्वल भविष्याचे निर्माते. उद्याच्या निर्मात्यांना निर्माण करण्यासाठी आपण आज काय करतो याचे खरे उत्तर फार निराशादायक आहे. हेच ओळखून कैक साहित्यिक मंचांनी, संकेतस्थळांनी व वाचनस्थळांनी बालविभाग सुरू केले आहेत. मात्र ते बालविभाग जणूकाही तिथे ओढूनताणून बळेच चिकटवले गेले की कसे? ही शंका त्यातील बालसाहित्य पाहून मनात उमटते. काही ठिकाणी तर बालविभागात बालसाहित्य वगळता ‘इतर सर्वकाही’ सापडतं.

अशावेळी मग जे थोडके पालक किंवा शिक्षक मोठ्या आशेने या विभागांकडे वळतात ते सुद्धा समाजमाध्यमांच्या व ‘गेमिंग’च्या जाळ्यात खोल फसत निघालेल्या उद्याच्या निर्मात्यांना निराशेने पाहत राहतात.

गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतांना बसलेला फटका, शैक्षणिक मंडळाची हलकी भूमिका, विद्यार्थ्यांचे आटत चाललेले आकलन क्षमता व एकाग्रता हे अंगीभुत गुण व त्यायोगे भविष्यात प्राप्त होणारी गुणवत्ता सारे काही ढासळत निघालेले आहे. आपण हे शांतपणे पाहत राहणे ‘टाकबोरू’स मंजूर नाही. त्यावर बालचमुंचे अवांतर वाचन हाच एक पर्याय आहे. यानेच आपण विद्यार्थ्यांना शिकण्याच्या विद्यार्थीदशेत आणू शकतो.

एकीकडे हे तर याउलट इतर ठिकाणी बालमनांस जे वाचायला मिळते ते त्यांना कट्टरतेत ढकलणारे आहे. लहानग्यांना कट्टरता पाजून त्यांचे पूर्वग्रहदूषित करणारा आमचा भारत कधीच नव्हता. विज्ञान-तंत्रज्ञान, दैवयोग-कर्मयोग, जीवनाकडे व माणसाकडे पाहण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन व पुरोगामीत्व बालमनात रुजवणारा आदर्श भारत आमचा होता, आहे.

हेच नेमके या बालचमूंच्या विभागात सापडेल अशी ग्वाही आम्ही पालकांना, शिक्षकांना आणि सुजाण नागरिकांना, तमाम वाचनप्रेमींना देत आहोत. येणाऱ्या देशाप्रती ते आमचे कर्तव्य आहे. आपणही आम्हास बालवाचकांप्रत पोहचवाल ही आशा.


{fullWidth}

نموذج الاتصال