मनोरंजन

[वाचनकाल : १ मिनिट]
magicians staff and hat

मनोरंजन विश्वात आता बऱ्याच न पाहण्याजोग्या गोष्टींची भर पडलेली आहे, दिवसेंदिवस पडत आहे. ‘न पाहण्याजोग्या’ गोष्टींचा अर्थ इथे लैंगिकतेकडे झुकलेला नाही. लैंगिकता दिग्दर्शक दर्शकांना कशी दाखवतो यावर तिचे बरेवाईट असणे ठरत असते. न पाहण्याजोग्या गोष्टी म्हणजे ज्यातून आपल्या आयुष्यात पूर्वीपेक्षा एकही जादाचा चांगला विचार, सवय किंवा दृष्टिकोन आपणाला न मिळता निव्वळ आपल्या वेळेचा बोऱ्या वाजवणाऱ्या गोष्टी – या फार घातक आहेत. मग जेव्हा ‘काय बघायचे’ याची निश्चिती आपणाकडे असेल तर ‘काय बघावे’ हा प्रश्न सतावणार नाही. पर्यायी जे पाहतोय ते ‘का पहावे’ हाही प्रश्न बाद. आणि त्यानंतर तुम्ही मनोरंजन म्हणून जे पहाल त्यात फक्त उरेल जीवनात काहीतरी भर पाडणारी, वेळेचे सार्थक करणारी यादी.

लेखकांना भावलेल्या, वेगवेगळ्या माध्यमांवरील वेगवेगळ्या प्रकारातील मनोरंजनावर गप्पागोष्टी, समीक्षण लेख या पृष्ठावर सापडतील. एखादा लेख ‘काय पाहू नका’ यावरही असेल. चित्रपटगृहात लागलेल्या नवनव्या चित्रपटांवर लिहिणे इथपासून ते अगदी पहिला मूकपट ते सर्व भाषेतील, सर्व प्रांतातील जुन्या ‘क्लासिक’पर्यंत. यातून मनोरंजनाकडे पाहण्याचा दर्शकांचा कलात्मक दृष्टिकोन आणखीनच बहरत जाईल यात शंका नाही.

परिणामी एकदा आलेला दर्दी दर्शक, वाचक इथून हटणार नाही हे नक्की.
{fullWidth}

نموذج الاتصال