भेट ना माणसासारखा

[वाचनकाल : १ मिनिट] 
एकरेषीय चित्र, भेट ना माणसासारखा, one line drawing

माणसाच्या माणूसपणाला जाणण्याचे माणसाने कितीही प्रयत्न केले तरी ते अपुरे ठरावेत अशा प्रकृती, प्रवृत्ती घेऊन माणूस या विश्वात हिंडत असतात. अशाच माणसाच्या माणूसपणावर बोलणारी आणि त्याला काहीतरी विचारू पाहणारी, समजावू पाहणारी, स्त्रग्विनी वृत्तातील गझल . . .
 
वृत्त : स्त्रग्विनी
लगावली : गालगा × ४


कोण तू माणसा चातका सारखा
का निघाला असा गौतमा सारखा ।।

सोडले तू कुठे बोचके पाठचे 
रिक्त तू भासतो कापसा सारखा ।।

शोधले का हवे ते पुरे शोध हा
जा घराला अता पाखरा सारखा ।।

का हवी नेहमी साधना वेगळी
तू घरी ही रहा सावता सारखा ।।

ज्ञान दे तू कधी अन कधी वेड घे
अन कधी हास ना पावसा सारखा ।।

देवपण भेटते साधनेने जरी
तू तुला भेट ना माणसा सारखा ।।

ज्याकडे चेतना अन सहनशीलता
त्याकडे थांग ना सागरा सारखा ।।


– मानिनी


• संदर्भ :

• वाचत रहा :


 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال