‘आनंदकंद’ वृत्तातील ही गझलकारा ‘मानिनी’ यांची गझल. ‘टाकबोरू'वरील पहिली आणि तितकीच उत्कृष्ट अशी ‘अलवार कैक झाले’ ही गझल दुहेरी अर्थाने महत्त्वाची आहे.
कवने कमीच होती, आनंद मांडण्याला
दुःखात मात्र येथे, गुलजार कैक
झाले।
आता इथे जिवाचे, बाजार कैक झाले
आजार थोडके अन, उपचार
कैक झाले।
शोधू कुठे अडोसा, लोकांत राहताना
विजनातही मनाला, शेजार कैक झाले।
सारेच वार मजला, कोठे समोर
आले
काही मुजोर होते, अलवार कैक झाले।
जो तो इथे अधाशी,
हातास काम नाही
कामे कमी निघाली, औजार कैक झाले।
निवडून जात
येते, किंवा उमेदवारी?
मतदार कोण नाही, लाचार कैक झाले।
कोणी
कितीक केली, कामे जनामनाची
आभार खूप होते, सत्कार कैक झाले।
हो
बासनात आहे, अमुची इमानदारी
आचार सोडले अन, सुविचार कैक झाले।
कोणास
दुःख कोणी, बेघर,गरीब झाले
मदती म्हणून केवळ, उपकार कैक झाले।
कवने
कमीच होती, आनंद मांडण्याला
दुःखात मात्र येथे, गुलजार कैक झाले।
{fullwidth}
'आनंदकंद' वृत्तात जीवनाचा सारांश बांधणारी उत्कृष्ट कलाकृती म्हणावी अशी ही सुंदर गझल. अशा आणखी 'वृत्तां'तील गझल वाचायला आवडेल. पुढच्या साहित्याच्या प्रतिक्षेत 😊
उत्तर द्याहटवानक्कीच.धन्यवाद.😊
हटवाछान
उत्तर द्याहटवाधन्यवाद😊
हटवा