विज्ञान आणि आपण

[वाचनकाल : ४ मिनिटे] 

विज्ञान दिवस, सर्व वैज्ञानिक साधनांनी बनलेले नवे साधन, fictional scientific eqiupment  contains all science eqiupments
विज्ञान हे फक्त पुस्तकी विचारात न ठेवता ते आचरणात आणण्याची आज देशाला जास्त गरज आहे.


राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञानावर भरपूर उलट-सुलट चर्चा ऐकायला, वाचायला मिळते. विज्ञान बरे की वाईट यावर सुद्धा सभा घडतात. पण विज्ञान दिवस संपला की आपल्या आयुष्यातील विज्ञान आपण पुन्हा विसरून जातो!‌ विज्ञानावरच्या या चर्चा सामान्य माणसाच्या सोप्या भाषेत असतील तर ही परिस्थिती नक्कीच बदलू शकेल म्हणून हा लेख . . . 
 
दैनंदिन विज्ञान
 
परवा होता २८ आपला राष्ट्रीय विज्ञान दिवस. भारतीय क्षेपणास्त्र उपक्रमांचे जनक डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २६ मे २००६ रोजी स्वित्झर्लंड येथे भेट दिली होती. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा विज्ञान दिवस तेथेही २६ मे रोजी साजरा होतो. आपण खरे पाहता मनुष्यप्राणी हा इतर प्राणी आणि पक्ष्यांपेक्षा दुबळा आहे. कारण, त्याच्याकडे जंगली प्राण्यांसारखे दात, पंजे, नखे काहीच नाही, त्याला पक्ष्यांसारखे उडताही येत नाही, तो शिकार करू शकत नाही. परंतु, सर्व प्राण्यांत मनुष्य हा फक्त बुद्धीच्या जोरावर आणि त्यातून जन्मलेल्या विज्ञानाच्या आधारावर सर्वश्रेष्ठ प्राणी ठरला आहे.
हे विज्ञानम्हणजे जादूची कांडीच आहे जणू! ज्यामुळे उत्क्रांती म्हणावी अशी क्रांती सर्वच क्षेत्रात घडून आलेली आहे. दैनंदिन जीवनातील सकाळी उठून वापरात असलेल्या ब्रश व कोलगेट पासून ते आंघोळीला वापरात येणारे थंड/गरम पाण्याचे गिझर, अन्न शिजविण्यास लागणारे गॅस, कपडे धुणारी मशीन, इस्त्री, फिरण्यास वापरायची सायकल, दुचाकी व चारचाकी, दूरच्या प्रवासासाठी बस, रेल्वे, विमान, जहाज! मोठमोठ्या कारखान्यात वापरली जाणारी यंत्रे, दूर अंतरावरील व्यक्तीशी बोलण्यासाठी भ्रमनध्वनी, मोबाईल्स, ऑफिसेसमधील प्रत्येकाच्या पुढ्यात असलेले संगणक व ज्ञान अर्जित करण्यासाठी वापरण्यात येणारे आंतरजाल अशा आपल्या सभोवती वेढलेल्या गोष्टीसगळंच तर विज्ञानाचं देणं!
विविध क्षेत्रांत घेतलेली गरूडझेप जसे जैवतंत्रज्ञानानं डाॅलीमेंढीपासून क्लोनिंगकरून तयार केलेली अगदी हुबेहूब तशीच मेंढी किंवा वैद्यकीय क्षेत्रात नैसर्गिक गर्भधारणा होत नसल्यास ‘टेस्ट ट्युब बेबी टेक्निकवापरून वंध्यत्वावर मिळवलेला विजय, त्वचारोपण, केशरोपण, यंत्राच्या साह्याने होणाऱ्या शस्त्रक्रिया, अवयवप्रत्यारोपण, रक्तबदल किंवा कृषिक्षेत्रात निरनिराळी दर्जेदार खते तयार करणे, संकरीत बी-बियाणे वापरून जास्तीत जास्त पीक घेणे, हरितक्रांती, दुग्धक्रांती किंवा . . ‌. किंवा ही सगळी विज्ञानाचीच तर कृपा!
 
विज्ञान
 
विज्ञानहे जगातील नैसर्गिक आणि भौतिक संरचनेचे परीक्षण व प्रयोग करून विकसित केलेले ज्ञान आहे. आणि या ज्ञानाचा व्यावहारिक हेतूंसाठी केलेला वापर म्हणजे तंत्रज्ञानआहे! या तंत्रज्ञानाच्या जोरावर मानव चंद्रावर जाऊन पोचला तरी तंत्रज्ञानाची प्रगती झपाट्याने होतेय. आज हाती असलेल्या मोबाईलमधील फीचर्सउद्या जुने होऊ शकतात इतकी झपाट्याने!
विज्ञान हे निरीक्षण, प्रयोग आणि निष्कर्ष यांवर अवलंबून आहे. त्यात सिद्धांत आहेत व त्यांचे स्पष्टीकरणही आहे! विज्ञान म्हणजे असे काहीतरी दर मिनिटाला उत्क्रांत होत आहे! कारण विज्ञान हे शास्त्र आहे आणि शास्त्र म्हणजे कुठल्याही विषयाचा तर्कशुद्ध अभ्यास!
पाण्यात निघणाऱ्या छोट्या बुडबुड्यापासून ते वर गेल्यावर क्षणार्धात खाली पडणाऱ्या वस्तूत भौतिकशास्त्र आहे. जगातील समस्त जिवंत वनस्पती, प्राणी व सुक्षमजीवांच्या  प्रत्येक अवयवांच्या भिन्न रचनेत आणि प्रक्रियेत जीवशास्त्र आहे. एखादा पदार्थ पाहून तोंडाला सुटलेल्या लाळेपासून तर एखाद्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळे तयार झालेली संप्रेरकं (हाॅर्मोन्स) यांमध्ये रसायनशास्त्र आहे. सूर्योदय, सूर्यास्त, भरती, ओहोटी, ग्रहण, राशी-नक्षत्रं यांत खगोलशास्त्र आहे, या ब्रम्हांडाचे नियम उलगडण्याचा प्रयत्न करणारे अंतराळशास्त्र आहे. हे आणि असे सगळे शास्त्र ज्याला सिद्ध करण्यास पुराव्याची गरज लागते ते म्हणजे  ‘विज्ञान’!
विज्ञानात थोतांडास जागा नसते थोडक्यात बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर!
असे हे विज्ञान आपल्या जीवनात अंतर्भूत झाल्याने आज आपले जीवन समृद्ध आहे. परंतु यातून आपल्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन मिळायला हवा; तरच त्याला अर्थ आहे.
 
वैज्ञानिक दृष्टिकोन
 
हा दृष्टिकोन फक्त जी व्यक्ती विज्ञान शिकलेली आहे तिच्यातच तयार होईल असे नसते. कारण, सामान्य भाषेत हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीने बघण्याची वृत्ती. आणखी साध्या शब्दात सांगायचे झाल्यास कुठलीही गोष्ट होते तेव्हा, ती का झाली?’ यामागील कारण शोधण्याची वृत्ती! बरेचदा ही वृत्ती मोठमोठ्या पदव्या घेतलेल्या लोकांकडे नसेल, पण एका सामान्य माणसाकडे असते!
अंधश्रद्धांना व विघातक परंपरांचा त्याग करणे म्हणजे असतो वैज्ञानिक दृष्टीकोन. उदाहरणार्थ, एखादा भोंदू बाबा लिंबूतून रक्त काढून दाखवतो तेव्हा त्याने मोठ्ठा चमत्कार केलाय म्हणून त्याचे पाय धरणारे सुशिक्षित लोक असू शकतात. मिथिलीन ऑरेंजलावलेल्या सुरीने लिंबू कापले तर त्यातील सायट्रिक ॲसिडशी त्याची रासायनिक प्रक्रिया घडून लाल रंग तयार होतो हे त्या अंगठाछाप बाबाला कुठूनतरी समजले असल्याने तो त्या सुशिक्षित माणसाला क्षणात मूर्ख बनवून जातो! याचे मुळ कारण म्हणजे बाबाची चिकित्सक वृत्ती! कारण त्याने जेव्हा हे कुठेतरी पाहिले असेल तेव्हाच असे का होतेय?’ याची चिकित्सा करून खरे कारण माहिती केलेले असते. पण सुशिक्षित माणसाकडे ही वृत्ती नसल्याने तो त्याला चमत्कारसमजून भ्रमात राहतो. 
असा चिकित्सक वृत्तीचा वैज्ञानिक दृष्टिकोन जर उपजतच आपल्यात असेल तर फारच उत्तम; पण जर तो नसेलतर तो हळूहळू का होईना, आपल्यात निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा फायदा तर होईलच; पण त्याहीपेक्षा जीवन विवेकाने आणि ताठ मानेने जगणे जास्त सोईस्कर होईल. कारण कुठेही भावनिक, आर्थिक, बौद्धिक फसगत होण्याची शक्यता पूर्णतः नष्ट होईल. 
परंतु हा दृष्टिकोन योग्य जागी वापरण्याकरीता आपल्या आजूबाजूला तशी परिस्थितीही असणे आवश्यक आहे. नाही तर कुठेही काही घडताना दिसले तरी आपली हजार दीड हजार वर्षांची गप्प बसा संस्कृतीहा चिकित्सक वैज्ञानिक दृष्टिकोन गुदमरवून टाकते. म्हणूनच गाय ही देवता नसून फक्त एक उपयुक्त पशू आहेअसे सांगणारा एखादाच सावरकर होतो आणि तोही कालांतराने विस्मृतीत गडप होतो. व वेगळाच सावरकर देशापुढे दाखवला जातो, असो तो मुद्दा इथे नको.
 
सद्यस्थिती
 
तसं पाहता उद्विग्न करणारी वस्तुस्थिती आहे ही परंतु याच्याशी मुकाबला करून विज्ञान हे फक्त पुस्तकी विचारात न ठेवता ते आचरणात आणण्याची आज देशाला जास्त गरज आहे. शाळा-महाविद्यालये बंद करून किंवा तिथे विज्ञान सोडून पोथीपुराणे वदवून आपण विश्वगुरू बनू शकत नाही हे सर्व सामान्यजनांस आकळेल तो खरा विज्ञानदिन.
 
वैज्ञानिकांचा कृत्रिम रक्त बनविण्याचा अनोखा प्रयोग
 
एका महत्वाकांक्षी प्रयोगात, वैज्ञानिक मानवी स्कंदपेशींपासून (Human Scandal/Stem Cells) तयार केलेल्या कृत्रिम रक्ताची चाचणी मानवावर केली जाणार आहे. 
हे रक्त तयार होण्यासाठी बहुअवयव निर्मितिक्षम स्कंदपेशी (Multifunctional Scandal/Stem Cells) विशिष्ट जैवरासायनिक स्थिती(Biochemical Conditions)मध्ये ठेवून, मानवी शरीरासारखी स्थिती प्राप्त करावी लागेल. त्यामुळे परिपक्व लाल रक्तपेशी मिळविता येतील. ओ-नेगेटिव्ह (O -ve) या दुर्मिळ रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या पेशींपासून असे कृत्रिम रक्त बनवून ते रूग्णाच्या शरीरात घालता येईल असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
पाहूया कसे काय होते ते . . .
 
 
 लेखन जुईली
 
संदर्भ :
१) छायाचित्र टाकबोरू
 
वाचत रहा :
 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال