तो माणूस कोसळल्याच्या गोष्टीची कविता


sketch of leaf-less tree
Link Caption is your's


कोसळत होता तो माणूस गेलं वर्षभर. पण म्हणालो, मीच कोसळतोय, बाबा तू थांब जरा. कौटुंबिक कारणे असोत की इतरही तो कोसळत गेला. भावनिक कारणे असोत की इतरही मी कोसळत गेलो. झालं काय? वर्षभरानंतर मी पाय गाडून उभाय. तो कोसळला की नाही सांगता येणार नाही. कारण, करकरत कोसळल्याचा आवाजच झाला नाही. त्याच्या जंगलात जाऊन सत्य तपासता येईलही मात्र ते धाडस कोणात उरलंय? एक आहे: झाडाची उपमा कमावलेला माणूस आमच्या सावलीचा आधारस्तंभ असणार बहुदा . . .


आणाभाकाशपथा
गाढवाच्या अवयवांसाठी
राखून जगणारा मी
तरी तुझ्या लग्नाची बातमी
वर्षभरानंतर धडकल्यावर हादरलोच
दु:ख वैगेरे काही नाही पण
निदान कळवलं असतंस कदाचित
तुझी आईही अद्याप मेली असावी
माहीत नाही


तू सुखी झालीस व्हावीस
असंही नाही मनात
तू कोण

तरी या हादऱ्यात कविताबीविता लिहायचो
म्हणून भल्या सकाळी आपल्या
एकत्रित मित्रांना फोन करून
बाहेर काढायला लावल्या
त्यांच्या रिश्टर स्केल


मग
चिंधीवरही लिहिणाऱ्या मी
मुद्दाम कागद शोधण्यात
वेळ घालवला
निवांत दात घासले
संडासवरून आलो
कपडे धुतले
पेन शोधला
शेवटी काहीच उरलं नाही
तेव्हा उरलेल्या एकमेव मैत्रिणीला
मेसेज टाकला


तुझ्या दोस्तीनीचं लग्न झालंय कदाचित
तुझंही झालं असेल
पण ते कळेलंच पुढच्या वर्षी
असं करा तुम्ही खंदा मोठ्ठा खोल खड्डा
आणि मिळून गाडा मला त्यात
कारण मी असणं
तुम्हाला सलत राहणारच
कितीही लग्नं केलीत तरी


परिणाम साधला गेला
या सर्वाने
खदखदून येणार होती जी कविता
तुझ्यासाठी

राहिली





{fullwidth}

4 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

  1. आणाभाकाशपथा ही तुझी कविता वाचली पण मला ती आवडली नाही. कवितेतले शब्द वाचल्यावर कळालं की तुझ्याकडे वैचारिक शुद्रता आहे, म्हणजे वैचारिक दृष्ट्या तो शूद्र आहेस आणि माणूस म्हणून एकदम नीच आहेस. माणसं तर काय पण कुत्रा सुद्धा तुझ्या असल्या कवितेवर मुतणार नाही. समोर असतात तर तुला तुझी लायकी दाखवली असती. तुझ्या मैत्रिणींनी खड्डा खोदून त्यात तुला गाढण्याची गरज नाही तुला संडासातच टाकला पाहिजे तीच तुझी लायकी आहे आणि राहील.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. इतरही कविता वाचा आणि असेच प्रोत्साहन द्या; निदान त्या कोणीतरी वाचतंय याचा पुरावा मिळेल मला. धन्यवाद.

      हटवा
  2. कवी म्हणून तुझ्यासाठी फक्त एकच वाक्य शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, वरील कविता वाचली आणि समजलं की माणूस म्हणून तर तो शूद्र आहेसच पण कवी म्हणून सुद्धा नीच आहेस. तुझं काव्य म्हणजे संडासात बसून संडासाच्या भिंतीवर जे काही वाक्य लिहितात त्या अवलादी सारख वाटतय. खरंतर तू मेल्यावर खड्डा खोदून त्यात तुला गाडण्याची गरज नाही. सकृत दर्शनी तू संडास प्रिय आहेस असं वाटतं म्हणून तुला संडासात गाडलं तर काही वाटणार नाही कारण तुझी लायकी तीच आहे. कदाचित तुला जन्म देणाऱ्याची चूक झाली की तुझ्यावर अशा प्रकारचे संस्कार झालेले दिसतात कदाचित त्यांच्यावरही असेच संस्कार झाले असतील म्हणून तू असा निपजलास. इंस्टाग्राम वर एका मित्राने तुझी कविता बघून मला सुचवलं होतं मला वाटलं बघू म्हणून तुझी कविता वाचायला आलो कवी म्हणून तू इतका चांगला नाहीस लिखाण सोडलं तर बरं होईल. तुझ्या कवितेवर मीच काय पण कुत्रा सुद्धा मुतणार नाही याची खात्री देतो.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. असेच प्रोत्साहन देत चला. धन्यवाद. कथाही लिहीत असतो मी पण सध्या त्या डिजिटल करायला वेळ पुरत नाही. मात्र तुम्ही जोडलेले रहा लवकरच त्याही डिजिटल करेन.

      हटवा
थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال