मानवतेचा पहिला बळी


lonely fearless eagle flying in blue sky
फोड दिसेल ते टाळकं कर भुगा कवटीचा नि खिमा मेंदूचा


उठता-बसता, खाता-पिता, दिवस-रात्र, रात्रं-दिवस, सकाळ-दुपार, दुपार-संध्याकाळ, उन्हाळा-पावसाळा, पावसाळा-हिवाळा, जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी, इथे-तिथे, तिथे-इथे, एकट्याने-दुकट्याने, स्वतंत्र-कळपाने, खुलेआम-भीतीने, विरोध-साथीने माणूसकीच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या कोणीही उठावं-बसावं, आणि छातीठोकपणे सांगावं-बोलावं या प्रकांड माणूसकीसाठी बळी जाण्याची तयारी आहे का? नाही! ती ताकद फक्त एक आद्यकवी बाळगून होता, कोण तो? मानवतेचा पहिला बळी . . .


का रे बाबा उगी तू गप्पा माणुसकीच्या हाणतो
रक्त काळ्या-गोऱ्या-भोऱ्याचं एक लाल मानतो

कर सार्थ जीभेची धार होऊ दे चिरफाड आतून-बाहेरून
नसताना फायदा उद्याचा भले कशाला मने शब्दाने बांधतो

जाण रे विषमता मान अस्पृश्यता सोवळे नि ओवळे
का बरं समानता हा विचार विज्ञानाचा तू मांडतो

जाण फरक शेंबडात पोराच्या आपल्या नि परक्याच्या
तळमळीने एकीच्या सर्व जिवातला जीव तू का सांधतो

झुकव मान मोडेपर्यंत पाठीवर थाप घेऊन समर्थाचा श्वान हो
कशाला जो घेईल जीव तुझा तो स्वाभिमान ठेवून तू हिंडतो

टेकव डोकं बडव गाल आणि निघ ना पुढे काही बिघडेल का
कशासाठी फुकाचं आव्हान बनून यांच्या रितींपुढे तू नांदतो

दे धोका कर की फसवणूक लुबाडून घे सगळ्यांचं सगळं
कशाला उगाच माणसातील माणसाला तू जाणतो

फोड दिसेल ते टाळकं कर भुगा कवटीचा नि खिमा मेंदूचा
मनानेच स्वतःच्या कशासाठी त्यात अकलेचा अंश रांधतो

होतील दंगे होऊदेत त्यात मार आणि मरूदेत
उगीच का झुंज देत ऐक्य-समता-बंधुता तू सांधतो

करू दे ना खून मिळून सगळ्यांना आपल्याच मातेचा
सुंदर विश्वाला जपा ही देणगी धरेची तू का सांगतो

घे मिटून डोळे उघडे तूही जा थंड ग्लानीत आता इतरांसारखा
विनाकारण सांग तू विद्रोहाच्या सीमा का जागेपणी लांघतो

करत सुट कत्तली
पेटव जिथेतिथे दंगली
भडकव, सडकव
दिसतील ती माथी
लुट माल
शोध गाल
कर लाल
खेळ बेताची चाल
तिरकी तिरकी
बन हिंसेचं प्रतिक
अन्
बुद्धीवादाला तू गोळी घाल

उठ धाव पळत सुट तूही विनाशाकडे
कशाला ओझं वागवत साऱ्या विश्वाचं तू रांगतो

का रे बाबा उगी तू गप्पा माणुसकीच्या हाणतो
रक्त काळ्या-गोऱ्या-भोऱ्याचं एक लाल मानतो

ऐक माझं खरंच बंद कर तुझा मूर्खपणा
असाच वागत राहशील तर दोस्ता रे
तुझाही मग एक दिवस तुकाराम होईल





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال