
मरगाड, मारगाडं, मटगार्ड, ढम्पर किंवा अजून कितीही अपभ्रंश असतील तरी मडगार्डचं काम तेच, चिखलापासून, पावसाच्या राड्यापासून, दगडधोंड्यापासून संरक्षण देणं. मडगार्ड असेल तर एका अर्थाने भविष्य सुरक्षित. मात्र हे नसेल तर? तर कोण्या एकाला उभं रहावं लागेल मडगार्डच्या भूमिकेत. पण मग प्रेम जडलेल्या सर्वांसाठी मडगार्ड झालेल्या त्याची सुरक्षिता? त्याचं भविष्य?
रेनकोट होता
तरी
भिजतच आलो
अवकाळी पावसात
येता येता
तुझ्यावरचा एकेक
दागिना हळुवार
उतरवत उतरवत
विचारा विचारांत
शेजारी
गाडी लावताना
कळलं
बापाच्या गाडीला
मडगार्डच नाही
घरात येईपर्यंत
मागं मागं
जात जात
चाळत राहिलो
आयुष्याला
मडगार्ड नसताना
त्यानं काढलेली वर्षं
आणि
तुझ्या शरीरावरचा
प्रत्येक दागिना
होत गेला
पूर्वरत
होता तसा
एकेक
{fullwidth}