स्फुट

[वाचनकाल : १ मिनिट]
third eye abstract art

स्फूट – शक्तीदायी विचार. छोट्या मांडणीतून, नेटाच्या धाटणीतून वाचकाला मानसिक बळ पुरवणारा उतारा म्हणजेच स्फुट हे मान्य परंतु स्फुट हे केवळ शक्तीदायी असावे हे अमान्य.

ललित, जीवनावर भाष्य करणारे, नवीन दृष्टिकोन देणारे, मनात एकच विचार दिवसभर रेंगाळत ठेवणारे किंवा चेहऱ्यावर स्मितहास्य उमटवणारे, त्याचा विषय सुद्धा सामाजिक, राजकीय, प्रेम काहीही व कोणताही असू शकतो. नियम फक्त एकच – त्या मिनिटभरात वाचले तसे पुढल्या मिनिटाला वाचकाने ते विसरता कामा नये. आपण नक्की काय वाचले ते नीट समजण्यासाठी, किंवा आवडले म्हणून, पुन्हा वाचायला वाचकांनी खिळून रहायला हवे.

वाचकांच्या एकाग्रता घटल्याच्या काळात वाचकांना वाचनात गुंतवून ठेवण्यास्ठी स्फुट रामबाण माध्यम आहे. म्हणून ‘टाकबोरू’साठी स्फुट ‘शक्तीदायी विचार’ न म्हणता ‘नवा विचार’ असे म्हणूयात.

{fullWidth}

نموذج الاتصال